नाशिकच्या पोरानं नाव काढलं; युपीएससीच्या परीक्षेत मिळवलं नेत्रदीपक यश

पुणे – देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (३० मे) जाहीर झाला.  यात पुण्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या अक्षय सुनिल वाखारे याने यात बाजी मारली आहे.

अक्षयने य़ुपीएससीच्या परिक्षेत ऑल इंडिया रँक 203 (AIR 203) पटकवला आहे. अक्षयचा हा तिसरा प्रयत्न होता. तिसऱ्या प्रयत्नात अक्षयने यशाचं शिखर गाठलं आहे. अक्षयने मिळवलेल्या या यशामुळे त्याच्यावर आणि कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

अक्षय हा मुळचा नाशिकचा. त्याचे वडिल नाशिकमधील करंन्सी नोट प्रेसमध्ये नोकरीला आहे आणि आई गृहीणी आहे. 2016 मध्य़े तो इंजिनिअरींगचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण पुर्ण केलं. 2017-18मध्ये कॉलेज असल्यामुळे त्याला अभ्यासाला फारसा वेळ मिळाला नाही. मात्र 2018 नंतर त्याने जोमात अभ्यासाला सुरुवात केली.आतापर्यंत त्याने दोनवेळा प्रयत्न केले मात्र त्याला यश मिळालं नाही. तिसऱ्या प्रयत्नात मात्र अक्षयने ऑल इंडिया रँक 203 मिळवत स्वत:ला सिद्ध केलं.