शोधा आणि तोडा असा फतवा काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुहास कदम यांच्या पदावर गंडांतर

सोलापूर : अभिनेत्री केतकी चितळेने (Actress Ketki Chitale) केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party President Sharad pawar) यांच्या विषयी टीका करणाऱ्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम (West Maharashtra President of NCP Students Congress Suhas Kadam) यांनी अजब फतवा काढला होता . मात्र त्यांनी काढलेला फतवा त्यांनाच महागात पडल्याचं चित्र आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसेचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, कॉलेज अध्यक्ष यांना सुहास कदम यांनी एक पत्र (Letter) लिहलं. या पत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या की येथून पुढे जो कोणी शरद पवार यांच्या विरोधात खालच्या शब्दात टीका करेल त्याला शोधा आणि तोडा.

यासंदर्भात पत्रात त्यांनी लिहलं की, आदरणीय पवार साहेब हा विचार आहे आणि त्याच विचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न समाज कंटाकाकडून होत आहे त्यामुळे हे सुधारण्याइतपत लायकीचे नाहीत, त्यामुळे यांना सरळ करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून, जो कुणी;पवार कुटुंबाबाबतीत खालच्या भाषेत वक्तव्य करत असेल तर त्याला शोधायचे आणि तिथेच तोडायचे ही मोहीम आपणास आज पासून सुरु करायची आहे. तरी सर्व पदाधिकारी यांनी याबाबत आपल्या विभागात तात्काळ बैठक घेऊन सर्व पदाधिकारी यांना सूचना करावी”.

दरम्यान, सुहास कदम मात्र त्यांची ही आक्रमक भूमिका चांगलीच महागात पडली. त्यांची ही भूमिका पक्षाच्या ध्येय धोरणांच्या उलट आहे. त्यामुळे तुमचे पद हे स्थगित करण्यात येत आहे. पुढील खुलासा येईपर्यंत आपले पद स्थगित (Post suspended) ठेवण्यात येईल असे पत्र राष्ट्रवादी विद्य़ार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यश सुनील गव्हाणे (Sunil Gavhane) यांनी काढले आहे.