चंद्रकांत खैरेंच्या क्लिप्स बाहेर आल्या तर खैरेंना आत्महत्या करावी लागेल – बांगर 

नागपूर –  राज्यातील दोन वाचाळवीर नेत्यांमध्ये सध्या चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. हे दोन नेते म्हणजे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार संतोष बांगर.  बांगर यांनी खासदार संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं चंद्रकांत खैरेंनी बांगर यांच्यावर टीका केलीय. त्याला आता बांगर यांनी प्रत्युत्तर दिलंय.  (If Chandrakant Khaire’s clips come out, Khaire will have to commit suicide – Bangar).

संतोष बांगर म्हणाले, चंद्रकांत खैरे वयाचं भान ठेवलं. आम्ही जर यांचं भांडं खोललं, तर मला वाटतंय चंद्रकांत खैरेंच्या क्लिप बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आधी संजय राऊतांना आव्हान देणाऱ्या संतोष बांगरांनी आता चंद्रकांत खैरेंना आव्हान दिलंय.खैरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना बांगर यांनी खैरेंच्या काही क्लिप्स आपल्याकडे असल्याचं सांगितलं. क्लिप्स बाहेर आल्या तर खैरेंना आत्महत्या करावी लागेल असंही बांगर म्हणालेत.