राजे, दिलेला शब्द पाळायला सगळेच काही देवेंद्र फडणवीस नसतात!

 मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभजीराजे ( Chatrapati Sambhajiraje ) यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यातच आज त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली.

शिवसेनेनं (shivsena) माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेच प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता असे संभाजीराजे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच  मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे.भाजपयुमोचे प्रदीप गावडे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला – युवराज संभाजीराजे छत्रपती.राजे, दिलेला शब्द पाळायला सगळेच काही देवेंद्र फडणवीस नसतात! असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले, राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं?

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धव ठाकरेंनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव  असं पाटील यांनी म्हटले आहे.