अशा लबाड नेत्याची जागा विधानसभेत नसून जेलमध्ये आहे; राजसिंह राणे यांची कांदोळकरांवर टीका

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीत बार्देश मधून सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे मतदारांना आमिष दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काल गंगानगर-खोर्ली येथे कांदोळकर हे मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे .

कांदोळकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप करण्यात येत असून प्रचार आठ वाजता संपतो मग साडे अकरा वाजता कांदोळकर हे त्याठिकाणी काय करत होते असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच नोंदणीकृत वाहनाचा वापर न करता दुसऱ्याच वाहनाचा वापर ते का करत होते याचे देखील उत्तर आता कांदोळकर यांना द्यावे लागणार आहे. याशिवाय काल त्यांच्या वाहनात निवडणूक प्रचाराचे साहित्य देखील सापडले असल्याचे देखील समोर आल्याने याच अनुशंघाने कलम १८८ अंतर्गत आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना घडत असलेल्या ठिकाणी काल निवडणूक आयोगाची टीम त्याठिकाणी दाखल झाली होती. पुढे निवडणुक आयोगाने पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस कांदोळकर यांना गाडीतून पोलीस स्टेशनला घेवून गेले. रात्री ३ वाजेपर्यंत कांदोळकर हे त्याठिकाणी होते असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे कांदोळकर यांची ती गाडी देखील पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून कांदोळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू लागले आहेत. खरतर स्वाभिमानी मतदारांना धनशक्तीच्या जोरावर विकत घेवू पाहणाऱ्या अशा नेत्यांना मतदारांनीच अद्दल घडवली पाहिजे. स्वतःचे काही कर्तुत्व नसल्याने आता कांदोळकर हे मतदारांना आमिष मतदारांना दाखवून निवडून येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अश्या लबाड नेत्याची जागा विधानसभेत नसून जेलमध्ये आहे. भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकर यांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत अशी टीका भाजप नेते राजसिंह राणे यांनी केली आहे.