Priya Dutt | काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर?

Priya Dutt | लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट त्यांचे उमेदवार जाहीर करू शकतात. यातच आता काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त (Priya Dutt) शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेसचे दिवंगत खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांची मुलगी प्रिया दत्तला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देऊन खासदार केलं होतं. मात्र आता याच प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सध्याच्या घडीला प्रिया दत्त या काँग्रेस पक्षात फारशा सक्रिय नाहीत. एका एनजीओच्या माध्यमातून त्या समाजसेवा करतात. समाजकारण करणं हा देखील राजकारणाचाच भाग आहे असं प्रिया दत्त मानतात. दरम्यान, प्रिया दत्त यांनी या वृत्ताचे खंडन केले असले तरीही प्रिया दत्त यांच्या सेनेतील प्रवेशाची सध्या खमंग चर्चा सुरु आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका