Women’s Reservation Bill लोकसभेत सादर, मोदी म्हणाले, हे एकमताने मंजूर झाल्यास …

Parliament Special Session Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन (Nari Shakti Vandan) अधिनियम हे विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत सादर केलं. यावेळी ते म्हणाले, आज मी राज्यसभेच्या सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करण्यासाठी आलो आहे की, जेव्हा जेव्हा हे विधेयक आमच्यासमोर येईल तेव्हा तुम्ही सर्वांनी एकमताने त्यावर निर्णय घ्यावा.

संसदेत महिला आरक्षण विधेयकाबाबत पीएम मोदी म्हणाले, लोकसभेत एक विधेयक (Women’s Reservation Bill) सादर करण्यात आले आहे. हे विधेयक महिला सक्षमीकरणाशी संबंधित आहे. आम्ही मुलींसाठी सैनिकांच्या शाळांचे दरवाजे उघडले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान हा सरकारी कार्यक्रम नाही. समाजाने ते स्वीकारले आहे. मुद्रा योजनेपासून जन धन योजनेपर्यंत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व खासदारांच्या मदतीने तिहेरी तलाकविरोधात पावले उचलण्यात आली.

पीएम मोदी म्हणाले की, राज्यसभा देखील राज्याचे प्रतिनिधित्व करते. आपण पाहत आहोत की सहकार्याने अनेक मुद्दे आहेत ज्यावर आपण पुढे जाऊ शकतो. कोरोनाच्या काळात राज्य आणि केंद्राने मिळून संघराज्याची व्याख्या केली. दरम्यान, महिला आरक्षण विधेयकांतर्गत विधानसभेच्या 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. याशिवाय लोकसभेतही महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. म्हणजेच, 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. तसेच, दिल्ली विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला

फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना

अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

“शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक…”, पडळकरांची खोचक टीका