जनकल्याणाच्या योजना : नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजारांचे अनुदान कसं मिळवाल ? 

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

योजनेचे स्वरुप

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे.

योजनेच्या अटी

◆लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे आवश्यक असून जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

◆नवीन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याच्या स्वतःच्या नावे किमान  ०.४० हेक्टर व योजनेतील अन्य बाबींसाठी किमान  ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

◆७/१२ व ८ अ चा उतारा.

◆लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते व ते खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

◆सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजार पेक्षा जास्त नसावे.

◆ तहसिलदार यांच्याकडील मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

◆ ग्रामसभेची शिफारस.

योजनेअंतर्गत लाभ

नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजार, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोअरिंग व पंप संचासाठी २० हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- १ लाख, सूक्ष्म सिंचन संच – ५० हजार, एचडीपीई/पीव्हीसी पाईप्स – ३० हजार, वीज जोडणी आकार – १० हजार व परसबाग यासाठी ५०० रुपये इतके अनुदान अनुज्ञेय आहे.

अधिक माहितीसाठी : तालुक्यातील पंचायत समिती(कृषि विभाग) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा