Pune Accident: मद्यधुंद PMPML चालकाने अनेक वाहनांना उडवले;पुणेकरांना पुन्हा ‘संतोष माने’ची आठवण 

Pune Accident News: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पीएमपीएल बस चालकाने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. शहरातील सेनापती बापट रोडवर (Senapati Bapat Road) असलेल्या वेताळबाबा चौकामध्ये या चालकाने बेदरकारपणे बस चालवत अनेक  गाड्यांना उडवले. मद्यधुंद अवस्थेत त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी घटना घडली त्यावेळी बसमध्ये जवळपास ५० ते ६० प्रवासी होते. पण अचानकपणे चालक नीलेश सावंत (Driver Nilesh Sawant) याने बेभानपणे बस चालवून तीन ते चार वाहनांना धडक दिली. आम्हाला वाचावा, बस थांबवा असा आवाज बसमधील प्रवासी देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.या प्रकरणी आरोपी पीएमपीएल चालकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे.

कार चालकासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर चिडलेल्या पीएमपी बस चालकाने बेदरकारपणे बस रिव्हर्स घेत कारला धडक देण्याच्या नादात बसमधील ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव टांगणीला लावला. या घटनेमुळे शहरात संतोष माने (Santosh mane ) प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची आठवण पुणेकरांना झाली. ही घटना सेनापटी बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलजवळ घडली. पीएमपी चालक निलेश ज्ञानेश्वर सावंत (३१, रा. वारजे माळवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर