गणेशोत्सवात पुणे व पिंपरी चिंचवडकरांची मेट्रोला पसंती

Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोतून (Pune Metro) प्रवासाला पुणे (Pune) व पिंपरी चिंचवडकरांची (Pimpri Chinchwad) पसंती दिली आहे. दिनांक १८/९/२३ ते २८/९/२३ या काळात पिंपरी चिंचवड स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर ४,०५,२८० प्रवास झाला आणि यातून ६३,२३,७१८/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. तर वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर ५,५६,०८२ प्रवास झाला आणि यातून ७७,४७,३३६/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. दिनांक २८ सप्टेंबर २३ रोजी पुणे मेट्रोमधून जास्त प्रवास होणारी स्थानके अनुक्रमे पीएमसी, डेक्कन जिमखाना, पीसीएमसी, वनाझ आणि गरवारे कॉलेज ही आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोने प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ केली होती.

ऑगस्ट २०२३ या महिन्यात एकूण प्रवास २१,१६,७७२ इतका होता आणि यातून ३,२५,८८,९००/- इतके उत्पन्न मिळाले. तर सप्टेंबर २०२३ या महिन्यात (२८ तारखेपर्यंत) १९,१३,२२७ इतका प्रवास होऊन यातून २,८१,८९, ७६०/- इतके उत्पन्न मिळाले.

ऑगस्ट महिन्यातील सर्वात जास्त प्रवास (१,६९,५१२) आणि उत्पन्न (३०,६३,३५०/-) हे दिनांक १५ ऑगस्ट २३ या दिवशी होते. सप्टेंबर महिन्यातील सर्वात जास्त प्रवास (१,६३,२२७) आणि उत्पन्न (२५,४८,३८४/-) हे काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिनांक २८ सप्टेंबर २३ या दिवशी होते.

दिनांक १ ऑगस्ट २३ रोजी पुणे मेट्रोच्या मार्गांचे विस्तारीकरण झाल्यापासून दिनांक २८ सप्टेंबर २३ पर्यंत पिंपरी चिंचवड स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर १६,८९,८५८ प्रवास झाला आणि यातून २,६७,४४,३०४/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर २२,७४,१९७ प्रवास झाला आणि यातून ३,२२,४२,६६५/- रुपये इतके उत्पन्न मिळाले.

पुणे मेट्रोचे पुढील मार्ग सुरू झाल्यापासून पालकमंत्री चंद्रकांत (Chandrakant Patil) यांनी मेट्रोमधून दोन वेळा प्रवास केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पालकमंत्री महोदय यांनी वनाज ते पीएमसी असा प्रवास केला. यावेळी त्यांच्या बरोबर महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि महा मेट्रो चे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे होते. पालकमंत्री महोदय यांनी मेट्रो प्रवासादरम्यान मेट्रो मधील स्वछतेचे कौतुक केले.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा