LokSabha Election 2024 | शरद पवार, सुळे, शिवतारेंनंतर आता सुनील तटकरे थोपटेंच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इतर पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केली नसल्याचे चित्र आहे.

यातच आता अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (LokSabha Election 2024) महायुतीत कलगीतुरा सुरु असून माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी (Sunil Tatkare) भोरमध्ये अनंतराव थोपटेंची भेट घेतली.

यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. तटकरे अचानक हेलिकॉप्टरनं भोरमध्ये दाखल झाले आणि थोपटेंच्या घरी पोहोचले. बारामतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाल्यानं भोरमध्ये थोपटेंच्या घरी भेटीगाठी वाढल्यायत. याआधी शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, विजय शिवतारेंनीही अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात