“पाकिस्तानी क्रिकेटर्स भारतात आले, आता कलाकारांनाही बोलवूया का?”; रईसच्या दिग्दर्शकाचे ट्विट

World Cup 2023: ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी (ODI World Cup 2023) सर्व संघ जवळपास भारतात पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा संघही (Pakistan Cricket Team In India) क्रिकेटच्या महाकुंभासाठी भारतात पोहोचला आहे. सात वर्षांनंतर भारतात आल्यावर पाकिस्तानी खेळाडूंचे भारतीय भूमीवर जोरदार स्वागत करण्यात आले. संघ आपला पहिला सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.

आता पाकिस्तानी खेळाडू भारतात येत असल्याच्या वृत्तावर ‘रईस’चे दिग्दर्शक (Raees) राहुल ढोलकिया (Rahul Dholakia) यांनी पाकिस्तानी कलाकार आणि गायकही भारतात परफॉर्म करण्याची आशा व्यक्त केली आहे.

राहुल ढोलकियाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “आता पाकिस्तानी क्रिकेटर्स अधिकृतपणे येथे आले आहेत. आता आम्ही आमच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानी कलाकारांना किंवा संगीत कार्यक्रमांसाठी संगीतकारांना अधिकृत आमंत्रण देऊ शकतो का?” ढोलकीयांच्या विधानावरून अपेक्षित वाद उफाळून आलाच. या पोस्टवर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.

 

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा