Pune Crime News : ‘माझी झाली नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही’; म्हणत पुण्यात तरुणीला भररस्त्यात मारहाण

Boy Beats Girl, Pune Crime: लग्नास नकार दिल्याच्या रागातून 19 वर्षीय (Pune Crime News) तरुणीला रस्त्यात अडवून तिला हाताने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी 20 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या अशा घटनेमुळे पुण्यात मुली सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे या 20 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केल आहे. आरोपी आणि तक्रारदार मुलगी दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर ओळख वाढत गेली आणि आरोपीने मुलीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यावेळी मुलीने त्याला लग्नाला नकार दिला होता. याचा राग आरोपीच्या मनात राहिला. या रागातून ही तरुणी नाना पेटेतून जात असताना तिला अडवलं आणि तिचा थेट हात पकडला. तरुणीला कॅम्प चौकात चलण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तु माझी झाली नाही तर कोणाची होवू देणार नाही, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमुद केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास