देशात कोट्यवधींच्या गाड्यांची विक्रमी विक्री; जाणून घ्या नेमकी का वाढत आहे मागणी?

Steady growth in luxury car sales : देशात लक्झरी कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. या वर्षी मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz), ऑडी (Audi), बीएमडब्ल्यू (BMW), लॅम्बोर्गिनी (Lambourgini) यांसारख्या गाड्यांची करोडो रुपयांची विक्री जुने सर्व रेकॉर्ड मोडू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशातील संपत्ती वाढल्याने लक्झरी कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. अल्पावधीत करोडोंची कमाई करणारे तरुण उद्योजक महागड्या गाड्यांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे लक्झरी कारच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे जगभरातील वाहन कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

एका अहवालानुसार, यावर्षी लक्झरी कारच्या विक्रीचा आकडा 45,000 च्या आसपास असेल. हा नवा विक्रम असेल. एकूण प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत लक्झरी कारचा वाटा सध्या केवळ एक टक्का आहे. मर्सिडीजने 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत 15,822 युनिट्सची विक्री केली, जी देशातील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.

याबाबत लक्झरी कार मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संतोष अय्यर म्हणाले, या वर्षी आम्ही सर्वांच्या सहभागाने बाजारपेठ वाढताना पाहू शकतो. लक्झरी कार मार्केटच्या एकूण आरोग्यासाठी हे एक चांगले लक्षण आहे. ते म्हणाले की, आज लक्झरी वाहनांची मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे महिला आणि पगारदार वर्गालाही आता आलिशान गाड्या घ्यायच्या आहेत.

ते म्हणाले की, देशातील पहिल्या सात-आठ शहरांमध्ये आलिशान कारचा प्रवेश दोन टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कालांतराने देशाच्या इतर भागांमध्येही लक्झरी कारची मागणी वाढेल. विक्रीच्या बाबतीत कॅलेंडर वर्ष 2023 सर्वोत्कृष्ट असेल असा कंपनीचा विश्वास आहे.

https://youtube.com/shorts/LLrVrVQpCd4?si=eqsX7Qv1NCTZNyMe

महत्त्वाच्या बातम्या-

World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Rohit Pawar : सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?