Pune crime : सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट! भाजप आमदारावर गुन्हा दाखल

पुणे : भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP Mla Atul Bhatkhalkar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याबाबत अतुल भातखळकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लेखी तक्रारीनंतर पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber Police) अखेर अतुल भातखळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.संदीप भुजबळ यांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात तक्रार दिली होती. ट्वीटरवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती. आता अतुल भातखळकर यांच्या पोलिसांकडून या पोस्टप्रकरणी चौकशीही केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.