Pune Drugs Case | पोलीस यंत्रणेच्या नजरेत न येण्यासाठी संदीप धुणे वापराचा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क

पुणे : पोलीस यंत्रणेच्या नजरेत न येण्यासाठी ड्रग्स (Pune Drugs Case) तस्करीचा मास्टर माईंड संदीप धुणे (Sandeep Dhune) हा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापर करून इतर साथीदारांच्या  संपर्कात राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याचबरोबर ओळख लपवण्यासाठी धुणे आधारकार्ड सारखी कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे समोर आहे.

दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, गुन्हे शाखेने पुण्यात विश्रांतवाडी, सांगलीत कुपवाडा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्राने जप्त केले. याप्रकरणी आता पर्यंत पुणे पोलिसांनी १० आरोपीना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पुणे पोलीस ७ आरोपींचा शोध घेत असून ब्रिटनचा पासपोर्ट असणारा संदीप धुणे हा ड्रग्स प्रकरणातील मास्टर माईंड समजल्या जात आहे.याच बरोबर दोन आरोपी विरोधात लूक आऊट नोटीस सुद्धा काढण्यात आली आहे.
महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने (डीआरआय) २०१६ साली संदीप धुणेला ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. यानंतर जुलै २०२३ मध्ये संदीप धुणेला याप्रकरणात जामीन मिळाला होता. संदीप धुणे यानंतर मेफेड्रोनचा फार्मुला देणाऱ्या केमिकल इंजिनियरचा शोध घेत होता. यावेळी एका मध्यस्था मार्फत डोंबिवली येथील युवराज भुजबळचा संपर्क मिळाला. यानंतर ऑक्टोबर २०२३ पासून कुरकुंभ येथील अर्थ केम या कारखान्यात मेफेड्रोन बनविले जाऊ लागले. दरम्यान ३० जानेवारी रोजी संदीप धुणे हा नेपाळ मार्गे पळून गेला. मेफ्रेड्रोनची निर्मिती पासून वाहतूक आणि वितरण संदभार्त इतर साथीदारांशी संपर्क करतांना पोलीस यंत्रणेला चकवा देण्यासाठी व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करत होता. तर ड्रग्स पेडलर (Pune Drugs Case) हे व्हाटसअपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहत असल्याचे तपासात समोर आले आहे.

याचबरोबर संदीप धुणे हा ओळख लपविण्यासाठी खोटे कागदपत्रे वापरत होता. धुणेने ४ आधारकार्ड नकली बनविल्याचे समोर आले आहे. बरोबर धुणे हा ज्याला कोणाला भेटत असे त्याचा फोटो काढायचा आणि त्याचे नकली आधारकार्ड तयार करत असल्याचे समोर आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

व्हीपीएन काय आहे ?
डेटा लिक न होता पुढचाशी संपर्क केला जातो. तुमचा पत्ता आणि तुमची ओळख गोपनीय राहते.आयपी आड्रेस ट्रॅक करता येत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव