Pune Lok Sabha | सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांचे पारडे जड

Pune Lok Sabha | सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांचे पारडे जड

पुणे : लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे सध्या देशभरात वाहत आहेत. पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha) देखील इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याने वाढत्या उन्हासोबत शहरातील राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. भाजपकडून सुरुवातीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) , माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी सचिव सुनील देवधर यांची नावे चर्चेत होती. यामध्ये आता शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे वलय असणारे शिवाजी माधवराव मानकर (Shivaji Madhavrao Mankar) यांनी उघडपणे आपणही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगत मोठा ट्वीस्ट निर्माण केला आहे.

सत्ताधारी भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पक्षातील उमेदवारीची गणिते सोपी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता लोकसभेसाठी (Pune Lok Sabha) इच्छुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार याबाबत चर्चा आणि अंदाज बांधला जात आहे. राज्यसभेला मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राम्हण समाजाला प्रतिनिधित्व दिल्याने सुनील देवधर यांच्या दावेदारीला लगाम लागलीय. तर मोहोळ, मुळीक, काकडे आणि शिवाजी मानकर असे मराठा चेहरे आता प्रमुख रेसमध्ये आहेत. मानकर यांच्या रूपाने लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा क्षेत्रात गणगोताचे मोठे जाळे असणारा प्रमुख दावेदार भाजपमध्ये पुढे आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मानकरांची खरी ताकद, त्यांचे सहाही विधानसभा मतदार संघात असलेले गणगोताचे जाळे

शिवाजी मानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे बंधू आहेत. तर मुळचे नारायण पेठेतील असल्याने शहराच्या मध्यवस्ती भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. बालेवाडीतील बालवडकर, कोथरूड मधील बांदल-सुतार, कसबा मध्ये मानकर, पर्वतीमध्ये कदम, वडगाव शेरीमध्ये गलांडे, पठारे, विश्रांतीवाडीमध्ये टिंगरे, शिवाजीनगरमध्ये बहिरट, निम्हन या सर्व राजकारणात त्या-त्या भागात प्रभाव असलेल्या घराण्यांशी जवळचे नातेसंबंध हा शिवाजी मानकर यांच्यासाठी सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. तसेच त्यांचा स्वतःचा मोठा मित्र परिवार आहे. मानकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांचे मित्र आणि त्यांचा सहा मतदार संघातील गोतावळा त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहील असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्या तुलनेत त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव

Previous Post
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीपेक्षा वयाने मोठी आहे राधिका मर्चंट, दोघांमध्ये आहे इतके अंतर

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीपेक्षा वयाने मोठी आहे राधिका मर्चंट, दोघांमध्ये आहे इतके अंतर

Next Post
Pune Drugs Case | पोलीस यंत्रणेच्या नजरेत न येण्यासाठी संदीप धुणे वापराचा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क

Pune Drugs Case | पोलीस यंत्रणेच्या नजरेत न येण्यासाठी संदीप धुणे वापराचा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क

Related Posts

ज्ञानवापी वाद : आता ऐतिहासिक वस्तुस्थिती समोर येणं गरजेचं- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मुंबई – काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशिदीबाबत (kashi vishwanath mandir – gyanwapi masjid) वाद सुरू असतानाच, या प्रकरणी…
Read More
Anjali Damania | अजित पवार नार्को टेस्टमध्ये दोषी आढळले नाही तर संन्यास घ्यायला १ मिनिटात तयार, अंजली दमानियांचे प्रतिआव्हान

Anjali Damania | अजित पवार नार्को टेस्टमध्ये दोषी आढळले नाही तर संन्यास घ्यायला १ मिनिटात तयार, अंजली दमानियांचे प्रतिआव्हान

पुणे कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची…
Read More
चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने 2 कार आणि दुचाकीला उडवले? नागपुरात 'हिट अँड रन'चा थरार | Chandrashekhar Bawankule Son

चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने 2 कार आणि दुचाकीला उडवले? नागपुरात ‘हिट अँड रन’चा थरार | Chandrashekhar Bawankule Son

महाराष्ट्रातील नागपूर येथे सोमवारी (09 सप्टेंबर) सकाळी एका वेगवान लक्झरी कारने अन्य दोन कार आणि दुचाकीला धडक दिली.…
Read More