भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ०४ लाख धन्यवाद मोदीजी उपक्रमाचे पत्र संकलन

Mumbai – भारतीय जनता युवा मोर्चा ने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली असून महिनाभराच्या कार्यकाळात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ०४ लाखापेक्षा अधिक पत्र संकलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २७ योजनांचे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन पत्र संकलन करण्यात आले अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे कौतुक केले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री अनुप मोरे, सुशील मेंगडे, शिवानी दानी, सुदर्शन पाटसकर, अरुण पाठक, बादल कुलकर्णी, निखिल चव्हाण, योगेश मैन्द, धन्यवाद मोदीजी युवा मोर्चा अभियान प्रमुख भैरवी वाघ-पलांडे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.