पोलिसांनी आधी केक कापला, वाढदिवस साजरा केला आणि मग अटक करून नेले

जेव्हा गुन्हेगार अल्पवयीन असतो अशा परिस्थितीत पोलिसांची चांगलीच अडचण होते. अनेक वेळा असे घडते की अत्यंत गंभीर गुन्हे अल्पवयीन मुलांकडून होतात. पण कायद्यापुढे हतबल असलेले पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुमचे हसू आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये पोलिस एका मुलाचा वाढदिवस साजरा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुलगा आधी केक कापतो आणि नंतर थंड पेय पितो. तो केक कापत असताना शेजारी उभे असलेले सर्व पोलीस टाळ्या वाजवत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पोलीस या मुलाचा वाढदिवस का साजरा करत आहेत.

वास्तविक, त्या मुलाभोवती उभा असलेला पोलिस ब्राझीलचा पोलिस आहे. मुलाचा 18 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. बड्डे बॉय चोर आहे आणि आजपर्यंत पोलीस त्याला तुरुंगात टाकू शकले नव्हते कारण तो मुलगा अजुन अल्पवयीन होता. पण पोलिसांना जेव्हा समजले की आज त्याचा 18 वा वाढदिवस आहे तेव्हा ते केक घेऊन मुलाच्या घरी पोहोचले आणि आनंदात त्यांनी एक छोटी पार्टीही आयोजित केली. यानंतर पोलिसांनी मुलाचा 18 वा वाढदिवस त्याच्यासोबत साजरा केला. त्यानंतर त्या अल्पवयीन चोरट्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’