Raha Kapoor Video | अनंत अंबानी आणि राहा कपूर यांचा मस्ती करताना गोंडस क्षण कॅमेरात कैद, पाहा व्हिडिओ

Raha Kapoor Cute Video : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नाआधीचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्येही स्टार्सनी आपली जादू दाखवली. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील त्यांची मुलगी राहासोबत दिसले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Raha Kapoor Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आलिया भट्टची मुलगी राहा कपूर अनंत अंबानीसोबत मस्ती करताना दिसत आहे.

राहा कपूर-अनंत अंबानींची मस्ती
अनंत-राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग ड्रेस कोड होता ‘जंगल फीवर’. या खास प्रसंगी आलिया भट्ट मुलगी राहासोबत जंगल थीमच्या ड्रेससोबत लाईमलाईट चोरताना दिसली. राहा आणि आलिया या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये आलिया राहासोबत राधिका मर्चंटचा भावी पती अनंत अंबानी यांच्याकडे जाताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

राहा आणि अनंत अंबानी यांचा गोंडस व्हिडिओ
आलिया भट्टच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, अनंतने राहाचा हात हळूवारपणे धरला आहे आणि तिला प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आलिया अनंतसोबत गप्पा मारतानाही दिसली. विशेष म्हणजे, रणबीर कपूर आणि आकाश अंबानी खूप चांगले मित्र आहेत आणि अंबानी कुटुंबातील मुले अनेकदा रणबीर आणि आलियाच्या घरी जाताना दिसतात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal