Dharmendra | ‘अच्छा तो हम चलते हैं’, धर्मेंद्र यांच्या नव्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

Dharmendra cryptic post : बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol) फिल्मी दुनियेसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. ते प्रत्येक लहान-मोठ्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. धर्मेंद्र यांच्या पोस्ट खूप व्हायरल होतात. कधी त्यांच्या जुन्या चित्रपटांची गाणी, कधी कुठल्यातरी चित्रपटातील त्यांचे फोटो, धर्मेंद्र काही ना काही किस्से शेअर करत राहतात. यावेळी त्यांनी असे काही शेअर केले आहे, ज्यामुळे सगळेच चिंतेत पडले आहेत.

धर्मेंद्रचे चाहते तणावात आले
धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट चाहत्यांना खूप आवडतात. इतकंच नाही तर ते त्यावर खूप कमेंट्सही करतात. पण धर्मेंद्र जेव्हा काहीतरी गंभीर पोस्ट करतात तेव्हा चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनतो. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या गूढ पोस्टमुळे लोकांची चिंता वाढत आहे.

धर्मेंद्र (Dharmendra) यांनी नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर स्वतःचा एक जुने फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अभिनेत्याच्या चित्रपटातील एका दृश्याचा आहे. पण अभिनेत्याच्या पोस्टच्या कॅप्शनमुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे. धर्मेंद्र यांनी या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अच्छा तो हम चलते हैं.’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

आवडत्या अभिनेत्याची अशी पोस्ट पाहून चाहते पुन्हा एकदा चिंतेत पडले आहेत. एका यूजरने लिहिले, ‘धरम जी आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला सदैव साथ द्यावी आणि आम्हा सर्वांसाठी निरोगी राहावे. लव्ह यू धरम जी.

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal