महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष फुटला नाही; राहुल गांधींचा पवार, ठाकरेंना टोला

India Alliance Meeting: इंडिया आघाडीची २ दिवसीय बैठक पार पडल्यानंतर आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.

महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएनए मिळेल. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आजही उभा आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव कोणी केला?. आपल्या शरीरातील रक्त काढले तर एकच डिएनए असेल. तो कुणाला भीत नाही. हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. हा बब्बर शेरचा पक्ष आहे. या पक्षात वाघिणी देखील आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

INDIA Meeting : ‘…मोदींना चंद्रावर नाही, तर सूर्यावर पाठवा’; लालू प्रसाद यादवांचा टोला

भाजप, नरेंद्र मोदी आणि आरएसएसला काँग्रेस पक्षाची भीती वाटते. महाराष्ट्रात यांची सफाई होणार आहे. इंडिया आघाडी भाजपला हरवणार आहे. काँग्रेस पक्ष नक्की जिंकेल. जे कर्नाटकात झालं ते महाराष्ट्रात होईल, असे राहुल गांधी म्हणाले.