फक्त माणुसकीचा धर्म जपण्यासाठी आजारपणात शिंदेंनी पवारांची भेट घेतली; मिटकरी यांचा ‘तो’ दावा चुकीचा 

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे, असा दावा आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

दरम्यान, शिंदे पवारांच्या भेटीत बरंच काही दडलंय अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. भविष्यात राज्यात नवीन सत्तासमीकरण जुळू शकते अशी कल्पना देखील त्यांच्या सुपीक डोक्यातून पुढे आली आहे. मात्र त्यांचा हा दावा सपशेल नाकारून फक्त माणुसकीचा धर्म जपण्यासाठी ही भेट झाली असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे (Rahul Londhe) यांनी केला आहे.

अमोल मिटकरी यांनी केलेला दावा निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे मत लोंढे यांनी व्यक्त केले आहे. अमोल मिटकरी हे तत्वज्ञानी असून त्यांच्या सुपीक डोक्यातून   कल्पना आली असली तरीही आपले नेते शरद पवार आजारी असताना त्यात राजकारण शोधू नये असा सल्ला राहुल लोंढे यांनी अमोल मिटकरी यांना दिला आहे.