राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला ; दोन गोळ्या झाडल्या, जिल्ह्यात खळबळ

उस्मानाबाद : राष्ट्रवादी युवक कॉग्रेस (ncp) अध्यक्षाच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात नुकतीच घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या जीवघेण्या हल्ल्यातून नितीन बिक्कड थोडक्यात बचावले आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

नितीन बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक गोळी ही गाडीच्या पुढील काचावर लागली आहे तर एक गोळी ड्राइवर सीटच्या बाजूला लागली आहे. सुदैवाने गाडीतील सगळे जण सुखरूप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पारा -फक्राबाद रोडवर बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.