शिवसेना फक्त पाहिली नाही, शिवसेना लहानपणापासून जगलो- राज ठाकरे

Mumbai- गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थातच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा (Padwa Melava Live) आयोजण्यात आला. या मेळाव्यात नेहमीप्रमाणे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या शब्दांनी टीकाकारांना गपगार केले. तसेच यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी शिवसेनेप्रती आपल्या प्रेमाबद्दल राज ठाकरेंनी जाहीरपणे भाष्य केले.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण नक्की कोणाचं, तुझं की माझं ह्यावर रस्सीखेच सुरु होती ते पाहताना मला त्रास होत होता. ‘शिवसेना’ मी लहानपणापासून जगलो. दुसरीत असल्यापासून शर्टाच्या खिशावर शिवसेनेचा वाघ अभिमानाने मिरवायचो. शिवसेना सोडताना मला वेदना झाल्या. मी शिवसेना सोडताना म्हणलं होतो की ‘माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे’. मी शिवसेना सोडल्यानंतर बोललो होतो की हीच चार टाळकी शिवसेनेला अडचणीत आणणार. मला त्याचं वाटेकरी व्हायचं नव्हतं, असे राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.