‘आज जनतेने सांगतिलंय की केजरीवाल आतंकवादी नाहीये, तर…’

पंजाब : आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने ‘आप’ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ १९ जागांवर आघाडी घेतली आहे.

या भव्य विजयानंतर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी देशातील जनतेला संबोधित केले आहे. ‘पंजाबमध्ये मोठमोठे षडयंत्र केले. आपण रोज ऐकत होते या पार्टीचे लोक स्वतःचे वोट ऐकून ट्रान्स्फर करत होते. सगळे AAP विरोधात आले होते. सर्वांचे एकच ध्येय होते की, कोणतीही पार्टी विजयी होवो पण AAP विजयी नाही झाली पाहिजे. मोठमोठे षडयंत्र केले. शेवटी सर्व एकत्र येऊन म्हणाले केजरीवाल आतंकवादी आहे. मित्रहो, आज या निकालांमुळे, देशाच्या जनतेने सांगितले की, केजरीवाल आतंकवादी नाही आहे. आज जनता ने सांगितलं आतंकवादी तुम्ही आहेत जे देशाला लुटत आहेत.’

‘आज आपल्याला संकल्प करायचा आहे की, आपण एक खरा भारत बनवू. जिथे कोणी उपाशी झोपणार नाही. जिथे आपल्या आई आणि बहिणींना सुरक्षित जगता येईल. आपण एक असा भारत बनवू जेथे पूर्ण जगातले मुलं भारतात शिकायला येतील. आजची क्रांती संपूर्ण देशात होणार आहे. सर्वांनी AAP पक्षात या,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.