“नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती, पण…”, राज ठाकरेंनी सांगितले खरे कारण

Mumbai- गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थातच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा (Padwa Melava Live) आयोजण्यात आला. या मेळाव्यात नेहमीप्रमाणे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या शब्दांनी टीकाकारांना गपगार केले. तसेच यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी नारायण राणेंच्या शिवसेना सोडण्याबाबत राज ठाकरेंनी मोठे भाष्य केले.

नारायण राणेंना (Narayan Rane) शिवसेना सोडायची नव्हती. मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो, बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा मी प्रयत्न केला पण ती भेट ती कोणीतरी घडू दिली नाही, असे राज ठाकरे म्हणाले.