Anantnag Encounter: ‘भारताशी पंगा घेतला तर तुमची मुलं अनाथ होतील’, केंद्रीय मंत्र्यांचा पाकिस्तानला थेट इशारा 

Rajeev Chandrashekhar On Anantnag:  काश्मीरमधील (Jammu & Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag Encounter Update) सुरू असलेल्या चकमकीवरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. अनंतनागमध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईची पोस्ट रिट्वीट करत राजीव चंद्रशेखर यांनी पोस्ट केली आहे.

त्यांनी लिहिलं आहे की, भारताचे अनेक शत्रू आहेत. आपल्याला रोखणं एवढंच त्यांचं ध्येय आहे. पण त्यांना माहीत असावं की, भारतीय सैन्याकडे आता हायटेक आणि घातक अद्ययावत हत्यारं आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, भारतीय सैन्याच्या नादी न लागण्यातच शहाणपण असेल. यह न्यू इंडिया है. भारत न डरेगा, न पीछे हटेगा.

तसेच, त्यांनी पुढे लिहिलंय की, भारतानं युद्ध पाहिलं आहे आणि आम्हाला युद्ध नको आहे. परंतु, जर तुम्ही भारताविरोधात युद्ध छेडलं तर मात्र तुमची मुलं अनाथ होतील. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या ५ दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे जंगलातील टेकड्यांमध्ये लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. रॉकेट लाँचर आणि इतर अवजड शस्त्रांचा वापर करून केलेल्या हल्ल्यात तीन दहशतवादी मारले गेल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दहशतवादी अजूनही लपून बसले आहेत. रविवारी (18 सप्टेंबर) सलग पाचव्या दिवशी त्यांना ठार मारण्याची कारवाई सुरूच आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल