हुंदाई कंपनी महाराष्टातून तामिळनाडूमध्ये कशी गेली? शरद पवार साहेबांनी ‘तो’ किस्सा सांगितला

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसने राजकारण आणि निवडणुकीपुरता विचार न करता विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकत्रित करण आणि त्यांच्या संघटनेतील शक्ती मधून समाजाची देशाची आर्थिक उभारणी करायची असेल तर यामध्ये काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांना संघटित करण्याचं काम करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतला आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अभियांत्रिक दिनानिमित्त (Engineers Day) आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की , राष्ट्रवादी काँग्रेसने शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना देखील संघटित केले आहे. अमरावतीमध्ये कार्यक्रमात गेलो असताना त्या ठिकाणी 5000 शेतकरी आले होते. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली शेतीचे उत्पादन ,दुधाचे उत्पादन, फळाचे उत्पादन या विषयांवर तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात काम करत आहे. हे यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आलं. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्यासाठी या तरुण मंडळींची साथ होती. हे एकत्रित संघटनेमुळे झालं असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, लातूरमध्ये ज्यावेळी भूकंप झाला होता. त्यावेळी मी सकाळी आठ वाजता ज्या ठिकाणी लातूरमध्ये भूकंप झाला होता. त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी हजारो घर पडली होती . संपूर्ण शहर नसतानाबूत झालं होतं त्यानंतर मी तिथे पंधरा दिवस राहून परिस्थिती पाहून तिथं बसून त्याकरिता निर्णय घेतले होते. त्यावेळी लातूरच्या विकास पुन्हा करण्यासाठी वीस ते पंचवीस अभियंत्र लोकांचा मला मोठा सहभाग लाभला आणि त्यातून पुन्हा एकदा लातूर शहर उभारण्यास मदत मिळाली. त्यांच्या मदतीने एक लाख घर बांधण्याचा निर्णय त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना घेतला होता. असे अभियांत्रिक दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी म्हटले.

मी नेहमी माणसं जोडायचे काम करत असतो. ज्या क्षेत्रातले आपल्याला जास्त समजत नाही. त्या क्षेत्रातले ज्याला ज्ञान आहे. तिथ आपण विद्यार्थ्यांसारखे जावे. मी मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, कृषिमंत्री झालो पण माणसाला सर्वच क्षेत्रातले ज्ञान नसते. ज्ञान नाही म्हणून कमीपणा घ्यायचा आणि शिकायची तयारी ठेवायची, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी इंजिनिअर डे कार्यक्रमात सांगितले.

शरद पवार पुढे म्हटले की ,संरक्षणमंत्री झालो तेव्हा मला आर्मीतले रॅंक माहिती नव्हते. लेफ्लनंट होता का लेफ्लनंट जनरल होता? कॅप्टन होता की मेजर जनरल होता? पण जबाबदारी घेतल्यानंतर सरळ उठलो आणि कोल्हापूरला गेलो. तिथं निवृत्त जनरल थोरात होते. सलग तीन दिवस सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी जायचो आणि संध्याकाळी परत यायचो. एखादा विद्यार्थी ज्ञान घेतो तसा मी त्यांच्याकडून माहिती घेत होतो. त्याचा उपयोग मंत्रालयाचे काम करताना झाला असे शरद पवार यांनी सांगितले.

इंजिनिअरचे योगदान सांगताना शरद पवार म्हणाले, मी राज्याचा प्रमुख होतो. त्यावेळी गणपती विसर्जनाचा दिवस होता. गणपती विसर्जनाला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याला लवकर झोपा येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे गणपतीच्या मिरवणूका कधी निघतील आणि कधी विसर्जीत होतील हे सांगता येत नाही. शेवटच्या दिवशी अधिक दक्ष राहावे लागते. त्यादिवशी मी लक्ष ठेवून होतो. शेवटचा गणपती परभणीचा होता. तो विसर्जीत झाल्याचे समजल्यावर पहाटे मी 3.30 ते 4 वाजता झोपयला गेलो. त्यानंतर अर्धा तासात घराच्या खिडक्या हालायला लागल्या. भूकंप असल्याचे जाणवले. ताबडतोब कोयनेला फोन केला. कारण तिथं भूकंपप्रवण क्षेत्र आहे. त्यानी सांगितले हा भूकंप कोयनेला नाही लातूरला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, मी सकाळी 7 वाजता विमान तयार ठेवयला सांगितले होते आणि आठ वाजता किल्लारीला पोहचलो होतो. 100 पेक्षा जास्त गावात भूकंपचा परिणाम झाला होता. हजारोंची घरं पडली होती. संपूर्ण जीवन उध्दस्त झाले होते. त्या संकटातून पुन्हा उभा राहण्यासाठी इंजिनियर क्षेत्रातील अनेक मित्र होते. त्यांना संघटित केले आणि संपूर्ण किल्लारीचे चित्र पालटले. लोक आता विसरले पण किल्लारीच्या लोकांनी मला पुढच्या आठवड्यात आम्ही कसे सावरलो आहोत हे बघायला बोलवले आहे. संकटातून सावरण्याची ताकत अनेकांत असते. पण त्यामध्ये अभियंता हा घटक देखील महत्वाचा असतो, असे देखील शरद पवार  यांनी सांगितले आहे.

शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, अभियंत्यांमध्ये खूप क्षमता आहे. त्यांनी ठरवलं तर देशाला जगाच्या कोणत्या शिखरावर नेवून पोहोचवतील याचा नेम नाही. यावेळी त्यांनी एका प्रख्यात इंजियिनयरचं नाव घेतलं ज्यांनी एक मोठ्या कार कंपनीचं इंजिन तयार केलं. संबंधित अभियंता हा हुंदाई या कार कंपनीचा निर्माता असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी बारामतीला एक म्युझियम केलेलं आहे. त्या म्युझियममध्ये त्यांचे फोटो दिसतील”, असं शरद पवार साहेब यांनी सांगितले. “त्या इंजिनीयरने मला सांगितलं. मी इंजिन का तयार करु नये? असं वाटलं. त्यांनी इंजिन तयार केली. त्यानंतर त्यांनी इंजिन तयार केल्यानंतर कंपनी उभी केली. त्यांनी मला सांगितलं की, मिस्टर पवार एकेदिवशी तुम्ही बघाल, आमच्या कंपनीच्या कार्सचा तुमच्या देशात सहज वावर होताना तुम्हाला दिसेल. विशेष म्हणजे आमच्या कंपनीची गाडी भारता इतकीच अमेरिकेतही लोकप्रिय असेल. त्या कंपनीचं नाव हुंदाई आहे. आज हुंदाई कुठच्या कुठे गेली”, असं शरद पवार म्हणाले.

“मी त्यांना सांगितलं की, तुझी कंपनी महाराष्ट्रात काढा. मी त्यांना इथे आणलं. जागा दाखवल्या. त्यांना त्या जागा पसंत पडल्या. पण नंतर राजकीय स्थिती सोईची नव्हती. मी नावं घेत नाही. त्यावेळी जे राजकारणी होते त्यांचा वेगळा दृष्टीकोन होता. हा दुसरीकडून आला. काही धंदा करायचं म्हणतोय. मग आपल्याला काय देणार? अशी चर्चा होऊ लागली. त्यामुळे मी पटकन मागे सरकलो आणि ठरवलं इथे काम करायचं नाही”, असे शरद पवार यांनी सांगितले.

“पण ही कंपनी भारतात कुठेना कुठे यायला पाहिजे, असं वाटत होतं. त्या काळात मी तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांना फोन केला. त्यांना सांगितलं एका गृहस्थाला घेऊन येतोय. आम्ही चेन्नईला गेलो आणि जयललिता यांनी एका दिवसात पाहिजे तेवढी हजरा एकर जमीन दिली, सवलती दिल्या आणि आज हुंदाई कंपनी त्या ठिकाणी गेली”, असा किस्सा शरद पवारनी यावेळी सांगितला आहे.

https://youtu.be/TX3th3G8Jxw?si=h95znRKD99Z0jYXs

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

You May Also Like