पवारांच्या नेतृत्वातच ओबीसी समाजाला न्याय मिळेल म्हणत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांवर विश्वास असलेल्या कार्यकर्त्यांचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रतोद जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज ओबीसी प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा, आंबेगाव, छत्रपती संभाजीनगर, खेड ,ठाणे ग्रामीण याजिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश तथा नव्याने नियुक्त्या करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी सेल मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमध्ये महाराष्ट्राची प्रगती आणि विकास केवळ शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वातच होऊ शकतो या विश्वासाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला आहे.

यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी समाजाला आणि मुस्लिम समाजाला शरद पवार साहेबच न्याय देऊ शकतात त्यांच्या नेतृत्वात आजपर्यंत ओबीसी आणि मुस्लिम समाजाला त्यांच्या समाजाच्या विकासाकरिता अनेक गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे शरद पवार साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ देण्यासाठी पक्षात आज प्रवेश केला आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तसेच अभिनंदन करतो. तसेच मुस्लिम समाजातील ओबीसी वर्गातील जाती घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आणि मानसन्मान मिळवून देण्यासाठी ओबीसी सेलचे अभिनंदन केले.

प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस मधील ओबीसी सेलमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे पक्षाच्यावतीने स्वागत आहे. ओबीसी समाजातील प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातच सुटू शकतात. या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण दिलेले समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही विसरणार नाही तसेच येणाऱ्या काळात राज्यात आणि देशात इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे. त्यावेळी ओबीसी समाजाचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल असे देखील यावेळी रवींद्र पवार म्हणाले. तसेच या संघर्षाच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर म्हणाले की ,येणाऱ्या काळात सत्ता संघर्षाची लढाई अधिक त्रिव होणार आहे. अशावेळी ओबीसी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी तयार केलेला पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते, शेतकरी, युवक हे शरद पवार साहेबाच्या सोबत आहेत कारण या पक्षाचा निर्माता आदरणीय शरद पवार साहेब आहेत,म्हणूनच येणाऱ्या काळात ओबीसी समाज शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदिने लढणार आहे. कारण ओबीसीचा जन्म हा मुळात शरद पवार साहेब यांच्या मंडल आयोगाची भूमिका घेतल्यामुळे झाला आहे. असे देखील यावेळी ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये अकबर जैगुले, बुरान कुरेशी, सुहेल खान, सेफ आली कुरेशी, अब्जल पठाण, बुरानौदीन कुरेशी, मिनाताई मोरे , सेफ अजम कुरेशी, सन्ना मुल्ल, आशा दिपक अंमाबाडेकर, रंजना जगताप, छाया मधुकर कांबळे इत्यादीने पक्षप्रवेश केलेला आहे.

यावेळी महाराष्ट्रातील अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहे. त्या पुढील प्रमाणे संजय कोळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, कल्पनाताई भालेराव नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष ओबीसी महिला, मुकेश पाटील अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण, प्रल्हाद बोंडे प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्ष सलीम बेग, समन्वयक आसिफ खलीफै यांची नियुक्ती करण्यात आले आहे. यावेळी रमाकांत म्हात्रे, मुकेश पाटील शहाजी दौंडमिसे, जालिंदर कटरे, सलीम बेग, आसिफ खलीफे, प्रल्हाद बोंडे, कल्पनाताई भालेराव, इस्माईल शेख इत्यादी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल