Rajya Sabha Election बिनविरोध होणार! भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंनी कारणही सांगितलं

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) भाजपा ने अशोक चव्हाण (Ashok Chavan), मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि अजीत गोपछडे (Ajit Gopchade) हे तीन उमेदवार उतरवले आहेत. मात्र चौथा उमेदवार देणार नसल्याचे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी स्पष्ट केल्याने आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार देणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘राज्यसभा निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. कारण सर्वांकडे आपापला मतांचा कोटा आहे. सर्वांकडे जिंकून येण्याचा कोटा असेल तर चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेण्याची गरज नाही. आम्ही चौथा उमेदवार देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल’, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole