Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Medha Kulkarni, Rajya Sabha Biennial elections : महाराष्ट्रात आगामी राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज दुपारी भाजपाकडून राज्यसभेसाठी ३ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan), मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि डॉ. अजीत गोपछडे  (Ajit Gopchade)यांना भाजपानं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

दरम्यान माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपाने संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला जे बोलायचे आहे, ते मी बोलते. राज्यसभेवर गेले असले तरी पुणे हे माझे माहेरघर आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रश्नावर मी बोलत राहणार आहे. दिल्लीच्या सभागृहात काम करण्याचा अनुभव माझ्याकडे नव्हता. या संधीच्या निमित्ताने आज तोही अनुभव मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

मी खूप वर्षांपासून भाजपामध्ये काम करत आहे. याआधी दोन वेळा नगरसेवक आणि एकदा कोथरुडची आमदार म्हणून काम केले. मला काम करण्याची संधी द्या, एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती. पक्षश्रेष्ठींकडे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी योजना असतेच. मी या निर्णयामुळे आनंदी आहे, अशीही प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!