महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole

BJP Candidates For Rajya Sabha Biennial elections : महाराष्ट्रात आगामी राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज दुपारी भाजपाकडून राज्यसभेसाठी ३ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपानं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. उमेदवारांची यादी जाहीर होताच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधलाय.

“महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येत आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी जीव ओतून काम केले, त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. मात्र, आयात केलेल्या नेत्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच हे केले आहे. नेत्यांवर डाका टाकण्याचे काम सुरु आहे,” असे नाना पटोले म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!