सर्व काही बारामतीसाठी; बारामती येथे नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मंजूरी

Ajit Pawar : राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यात बारामतीसह जळगांव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया अशा सहा ठिकाणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना मंजूरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रयत्नातून हे बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय (Baramati Government Nursing College) होत आहे.

राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन पॅरामेडीकल अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज राज्यात सहा नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना मंजूरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

यामध्ये बारामती, जळगांव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया या नर्सिंग महाविद्यालयांचा समावेश आहे. या निर्णयाचा फायदा पॅरामेडीकल क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. नवीन नर्सिंग महाविद्यालयामुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. बारामतीमध्ये सध्या अहिल्याबाई होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून त्याला संलग्न हे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय नर्सिंग महाविद्यालय होणार आहे.

त्याचबरोबर बारामतीत शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे काम सुरु आहे. आता नव्याने मंजूर झालेल्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयामुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. बारामती येथे होणाऱ्या या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचा फायदा पुणे जिल्ह्याबरोबरच बारामतीला लागून असणाऱ्या सातारा, अहमदनगर, सोलापूर येथील विद्यार्थ्यांना आणि तेथून येणाऱ्या रुग्णांना होणार आहे. बारामती येथे नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालय मंजूर झाल्याच्या निर्णयाचे सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole