Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

Praful Patel: राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीतून आतापर्यंत ४ उमेदवारांची नावे समोर आली आहे. यात भाजपाचे ३ उमेदवार अशोक चव्हाण, अजीत गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. तर शिवसेना शिंदे गटातून मिलिंद देवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मात्र अद्याप अजित पवार गटातून कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. याबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.

प्रफुल पटेल हे सध्याही राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यामुळे ते राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे. तांत्रिक बाबींचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं सुनिल तटकरे म्हणाले. खासदारकीची 3 वर्ष शिल्लक असताना पटेल राजीनामा देऊन पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लढणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!