रामदास आठवले यांनी स्वामी रामदेव बाबा यांच्या पतंजली विद्यापीठाला दिली भेट

मुंबई   – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू स्वामी  रामदेव बाबा (Ramdev Baba)  महाराज यांच्या हरिद्वार (Haridwar) येथील पतंजली योग विद्यापीठ (Patanjali Yog University) येथे स्वामी रामदेव महाराज यांची आज केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी
आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrushna) यांचीही  रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. पतंजली योग विद्यापीठातर्फे स्वामी रामदेव बाबा यांनी रामदास आठवले यांचे हार्दिक स्वागत केले.

स्वामी रामदेव महाराज आणि आचार्य बाळकृष्ण ची आहे जोडी म्हणून चालू आहे पतंजली ची गाडी
स्वामी रामदेव महाराज ने जगा दी है गाव गाव की गली गली
इसलीये पोहोच गयी है गाव गाव पतंजली!
मुझे अच्छे लगते है बाबा रामदेव महाराज
इसलीये आया हू पतंजली आज।
बाबा रामदेव के सिर पर चढाओ शक्तिशाली ताज ।

अशी उत्स्फूर्त कविता सादर करून ना.रामदास आठवले यांनी पतंजली योग विद्यापीठ हर्ष उल्हासाने उत्साहित केले. यावेळी  रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी सीमा आठवले,पुत्र जित आठवले आणि कुटुंबीय उपस्थित होते.