राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत दम नाही; रामदास आठवले यांची खोचक टीका 

मुंबई  – माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत काही दम नाही आणि या यात्रेचा आम्हाला काही गम नाही. राहुलजींच्या नेतृत्वात जोर नाही ; म्हणून एनडीए च्या जीवाला घोर नाही  कारण मोदींच्या नेतृत्वात भाजप कुठेही कमजोर नाही अशा काव्यमय शैलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी काँग्रेस च्या भारत जोडो यात्रेवर  टीकेचा निशाणा साधला.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे.खरेतर राहुल गांधी यांनी काँग्रेस जोडो यात्रा काढली  पाहिजे. काँग्रेस मधून रोज त्यांचे लोक बाहेर पडत आहेत. काल गोवा येथे काँग्रेस चे 8 आमदार काँग्रेस सोडून  भाजप मध्ये गेले. देशभर काँग्रेस तुटत आहे. गलितगात्र झालेल्या काँग्रेस ला ; जागोजाग तुटलेक्या काँग्रेस ला पुन्हा जोडले पाहिजे. भारत तर मुळात अखंड उभा आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधनानामुळे विविध जाती धर्म भाषा प्रांताचा  भारत  एकसंघ जोडला गेला आहे. याची राहुल गांधी यांनी जाणीव ठेवली पाहिजे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीतून केंद्र सरकार भारत एकसंघ ठेऊन आहे. भारत प्रगतीपथावर आहे.त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासमोर राजकीय आव्हान उभे राहू शकत नाही असा टोला  रामदास आठवले यांनी आज राहुल गांधी यांना मुंबईत लगावला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि. 16 सप्टेंवर रोजी सकाळी मुंबई विमानतळावरुन औरंगाबादला रावना होणार आहेत. दिवंगत मंत्री  प्रीतमकुमार शेगावकर यांचे पुत्र प्रशांत शेगावकर  यांचे दि.12 सप्टेंबर रोजी निधन  झाले असून  उद्या दि.16 सप्टेंबर रोजी त्यांची  रिपाइं तर्फे जाहीर श्रद्धांजली सभा औरंगाबाद मध्ये  आयोजित करण्यात आली असून या सभेत रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.