Gokhale Institute | गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पुणे मधील अकॅडमीक बिल्डिंगमध्ये देशविरोधी पोस्टरवर पेंटींग करणारे नक्की कोण?

पुण्यातील नामवंत इन्स्टिट्यूट गोखले इन्स्टिट्यूट (Gokhale Institute) ऑफ पुणे येथील अकॅडमी बिल्डिंग मध्ये गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या इलेक्शन कमिशनच्या पोस्टरवर लोकशाही विरुद्ध व देश विरोधी गोष्टी लिहून त्याची छेडछाड करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये गोखले इन्स्टिट्यूटचा व इलेक्शन कमिशनचा लोगो वापरून नोटा या पर्यायाला मतदान करा अशा पद्धतीचा मजकूर आढळून आला.

अशा पद्धतीचे बॅनर हे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये (Gokhale Institute) गेले दोन-तीन दिवस लागले आहेत, तरीसुद्धा त्यावर प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही. इन्कलाब झिंदाबाद घोषणेमागून लोकशाहीची हत्या करणारे नेमके कोण आहेत? या पोस्टची छेडछाड करणाऱ्याविरोधात जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन आज करणार आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन व पोलीस तक्रार करणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके