Ramdas Athawale | भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार

Ramdas Athawale | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या दि. १२ एप्रिल पासून छत्तीसगड , मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे एनडीएचे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक ठरले आहेत. देशभर सर्व राज्यांत भाजप उमेदवार आपल्या प्रचारासाठी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची सभा आयोजित करीत आहेत.

दलित बहुजनांचे लोकप्रिय राष्ट्रीय नेतृत्व एक सेलिब्रिटी वलय लाभलेला चेहरा म्हणजे रामदास आठवले असून संपूर्ण देशात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे देशभर रामदास आठवले यांना भाजप उमेदवार प्रचारासाठी निमंत्रित केले जात आहे.

रामदास आठवले येत्या दि. १२ एप्रिल रोजी छत्तीसगड मधील रायपूर येते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दि.१३ एप्रिल रोजी मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे भाजप उमेदवरांचा ते प्रचार करणार आहेत. दि.१४ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संसदेत आयोजित कार्यक्रमात रामदास आठवले उपस्थित राहतील. तसेच त्याच दिवशी दि.१४ एप्रिल रोजी दुपारी रामदास आठवले मुंबईत चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दि.१५ एप्रिल रोजी ना.रामदास आठवले हे आसाम चा दौरा करणार असून आसाम मध्ये हेलिकॉप्टर द्वारे रामदास आठवले प्रचार दौरा करणार आहेत. आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५ उमेदवार लोकसभा निवडणुक लढत आहेत. त्यानंतर १७ एप्रिल रोजी ना. रामदास आठवले राजस्थान मधील जयपूर येथे ना रामदास आठवले भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके