माझं बाबर आझमवर प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचंय; रमीझ राझाने पाकिस्तानी कर्णधाराला घातली मागणी!

Ramiz Raja Wants To Marry Babar Azam: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसोबत (Babar Azam) लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर रमीझ राजाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. बाबर आझम श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीगमध्ये (Lanka Premiere League) खेळत आहे. तो प्रथमच या लीगचा भाग बनला आहे आणि 7 ऑगस्ट रोजी त्याने शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मॅच विनिंग शतकी खेळीनंतर रमीझ राजाने आझमचे तोंडभरुन कौतुक केले.

बाबर आझमच्या निरंतरतेबद्दल बोलताना रमीझ राजाने एक विचित्र दावा केला असून, तो आपल्या कौशल्याच्या शिखरावर असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करू इच्छितो. रमीझ राजा एलपीएल कॉमेंट्री पॅनेलचा भाग होता आणि त्याने बाबर आझमला त्याच्या 10 व्या टी20 शतकाबद्दल अभिनंदन करताना एक मजेदार टिप्पणी केली.

रमीझ राजा म्हणाले, “क्लास आणि दर्जेदार, सहजतेने अर्धशतक पूर्ण केले. कठीण परिस्थितीत अशी खेळी खेळला, शेवटी तो आमचा (पाकिस्तान) मुलगा आहे. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचे आहे.” राजा यांचे भाष्य असलेली व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.