Ranajgajit Singh Patil | “ज्यांना खासदाराचं काय काम असतं हे माहीत नाही, ते आम्हाला विचारतात ४० वर्षात काय काम केलं?”

Ranajgajit Singh Patil | लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराणे जोर धरला आहे. धाराशिव लोकसभेच्या निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना बघायला मिळत आहेत. “ज्यांना खासदाराचं काय काम असतं हे माहीत नाही, ते आम्हाला विचारतात ४० वर्षात काय काम केलं?” अशी घाणाघाती टीका राणाजगजितसिंह पाटील (Ranajgajit Singh Patil) यांनी विद्यमान खसदारांवर केली आहे.

पुढे बोलताना  राणाजगजितसिंह पाटीलम्हणाले, खासदारांचे काम असते आपल्या भागात मोठे केंद्रीय प्रकल्प आणणे. आपल्या जिल्हयासाठी केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आणणे, आपल्या भागात जी अडचण असेल ति सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे. मात्र आपल्या विद्यमान खासदारांनी आपल्या भागात किती निधी आणला, कोणती समस्या सोडवली याचा अभ्यास केला असतं जे कटुवास्तव आहे जनतेच्या आणि समोर येईल.

विरोधक आज विचारत आहेत मागील 40 वर्षात काय केले आहे? तर लक्षात घ्या 40 वर्षांपूर्वी लातूर – धाराशिव हा मोठा जिल्हा होता, त्यात फक्त एक सारखर कारखाना होता तो म्हणजे तेरणा.  त्यांची क्षमता जेवढी होती त्यासाठी ऊस कर्नाटकातून आणावा लागत होता, आज देशात सर्वाधिक साखर कारखाने आपल्या धाराशिव मध्ये आहेत. कुठून आले कारखाने? तर ऊस उपलब्ध झाला म्हणून कारखाने आले, ऊस क्षेत्र वाढले कारण पाणी उपलब्ध झाले म्हणून आणि पाणी कुठून उपलब्ध झाले तर डॉ. पद्मसिंह पाटील साहेब पाटबंधारे मंत्री असताना जे काम केले त्यामुळे हा कायापालट झाला आहे. हजारो कोटी रुपये जे आजा शेतकऱ्यांच्या घरात येतात ते आजपर्यंत आमच्याकडून झालेल्या कामामुळे येतात. असे पाटील म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब