Loksabha Election | “मविआचा उमेदवार हातात मशाल घेवून निघाला आहे. मात्र, त्याला आपण काय बोलतोय?, याचं भान नाही”

धाराशिव : महाविकास आघाडीचा विद्यमान खासदार (Loksabha Election) हातात मशाल घेवून निघाला आहे. मात्र, त्याला त्याच्या पदाचे  आणि आपण काय बोलतोय?, याचं भान नाही. अन् त्या मशालीत तेल ओतायच काम पवार साहेब करीत आहेत. किती पेटेल यांची गॅरंटी नाही, अन् पेटली तर वरून एक बाण गेला तर ती मशाल कधी विझेल हे सांगता येत नाही. “..अरे तुला माहित आहे का प्रभू श्रीराम म्हणजे काय? रामाचे चारित्र्य काय? रामाचे विचार काय? गल्लीबोळातील पोरासारखं हा लोकसभेचा उमेदवार बोलतोय..” अशी टीका माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.

महायुतीच्या उमेदवार (Loksabha Election) अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत तूफान फटकेबाजी करताना रविंद्र गायकवाड यांनी  राम मंदिर झाल्यास नोकरी मिळणार आहे का? या ओमराजे निंबाळकर यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले,  शिवसेना आणि भाजपचा कार्यकर्ता रामशीला घेवून गावोगावी  फिरला आहे. राम हे आमचे आराध्य दैवत आहे. राम मंदिराचे महत्व काय हे फक्त आम्हाला माहिती आहे. ते आमच श्रद्धास्थान आहे. यावरच हा देश तरणार आहे. राम मंफिर व्हावे ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हायेस्ट लीड या विधानसभा मतदार संघातून बसवराज पाटील, मी, ज्ञानराज चौगुले, सुरेशदादा बिराजदार आणि येथील प्रत्येक कार्यकर्ता मिळवून देईल. येथे आपल्याला शंभर टक्के यश मिळणार आहे. त्यामुळे राणा पाटील तुम्हाला काळाजी करायची गरज नाही, अशा शब्दांत रविंद्र गायकवाड यांनी विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब