राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पुणे दौऱ्यावर

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत ( Rashtriya Swayamsevak Sangh’s Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat ) येत्या २२ एप्रिल पासून पुणे दौऱ्यावर ( Pune tour )आहेत. २३ अणि २४ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील ( Province of Western Maharashtra ) संघटनात्मक कामाच्या विविध बैठकांमध्ये त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव ( Dr. Praveen Dabdaghav )  यांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी बैठक २३ आणि २४ एप्रिलला पुण्यात फुलगाव ( Phulgaon ) येथे होणार आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास नियमित संघटनात्मक कार्यासाठी आहे. तसेच हडपसर येथील डॉ दादा गुजर माता-बाल रुग्णालयाचे ( Dr. Dada Gujar Maternal and Child Hospital ) उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सानेगुरुजी प्राथमिक विद्या मंदिरासमोर माळवाडी, हडपसर,पुणे येथे होणार आहे.अशी माहिती डॉ प्रवीण दबडघाव यांनी दिली.