मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकत वाढली; कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत दिग्गज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई   – आज मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते व लोणावळा माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर (Vilas badekar)  यांच्यासह अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP)  झेंडा हाती घेतला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांच्या उपस्थितीत आणि आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आज हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ (Maval) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पंचवीस वर्षांच्या प्रयत्नानंतर अशक्य असा मावळचा बालेकिल्ला सुनील शेळके यांनी जिंकला. केवळ निवडून न येता जनसेवेच्या कामांचा ओघ त्यांनी सुरु केला, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी सुनील शेळके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. लोणावळा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आव्हाड यांनी यावेळी दिले. विलास बडेकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून पवारसाहेबांच्या पुरोगामी विचाराला मावळ विधानसभेत पुढे नेण्यासाठी ते सहकार्य करतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. तसेच सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विलास बडेकर यांच्यासह लोणावळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष,काँग्रेसचे नगरसेवक संजय घोणे, काँग्रेस कामगार आघाडी अध्यक्ष फकीर गवळी, लोणावळा शहर उपाध्यक्ष राजू तिकोणे, ज्येष्ठ नेते प्रकाश हरपुडे, पांडुरंग हारडे, काँग्रेस देहूरोड शहर कार्याध्यक्ष दीपक चौगुले, काँग्रेस देहूरोड शहर युवक अध्यक्ष संदीप डुगळज, भारतीय वाल्मिकी समाज उपाध्यक्ष संदीप सुरेश बोथ, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे मावळ उपाध्यक्ष इस्माईल इब्राहीम शेख यांनी आज पक्षात प्रवेश केला.