राज्यसभा निवडणूक : देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांशी साधला फोनवरून संवाद

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता दुसरीकडे भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांना फोन केल्याची माहिती मिळते आहे. राज्यसभेत ठाकरे सरकारला पाठींबा देण्यासाठी तयार असलेले अपक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.