World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

Ravichandran Ashwin Could Retire After World Cup: टीम इंडियाने भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) साठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाला (Team India) वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासोबत पहिला सामना खेळायचा आहे. याआधी टीम इंडियाला इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्ध 2 सराव सामने खेळायचे आहेत.

2023च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे असे अनेक खेळाडू आहेत जे वर्ल्ड कपनंतर टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकणार नाहीत. या यादीत पहिले नाव टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे (Ravichandran Ashwin) ​​आहे. चला तर मग जाणून घेऊया की अश्विन टीम इंडियाकडून खेळताना का दिसणार नाही?

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. या विश्वचषकात टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात अश्विन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अश्विनने यापूर्वी टीम इंडियासाठी 2015 आणि 2019 वर्ल्ड कप खेळला आहे. मात्र या विश्वचषकानंतर अश्विन वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेईल आणि कसोटी फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करेल, असे मानले जात आहे.

कारण, अश्विन आता 37 वर्षांचा आहे आणि 2024 मध्ये तो 38 वर्षांचा होईल आणि या वयात तिन्ही फॉरमॅट खेळणे संघासाठी खूप कठीण असेल. त्यामुळे अश्विन वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी शेवटचा वनडे सामना खेळताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा