Blasts in Balochistan : पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा भारताच्या गुप्तचर संस्थेवर मोठा आरोप

Blasts in Balochistan- शुक्रवारी झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांमध्ये भारताच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने शनिवारी केला. या स्फोटातील मृतांची संख्या 65 वर पोहोचली आहे. बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला असून आत्मघातकी स्फोट घडवून आणला. काही तासांनंतर, खैबर पख्तुनख्वामधील हंगू शहरातील एका मशिदीत आणखी एक स्फोट झाला, ज्यात किमान 5 लोक ठार झाले.

या दोन आत्मघातकी हल्ल्यांनंतर पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) या गुप्तचर संस्थेला जबाबदार धरले आहे. बुगतीच्या आरोपावर भारत सरकारने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

खैबर पख्तुनख्वामधील हंगू येथील पोलीस स्टेशन मशिदीला लक्ष्य करून झालेल्या दुसऱ्या बॉम्ब हल्ल्यात, स्फोटाच्या प्रभावाखाली मशिदीचे छत कोसळून पाच जण ठार झाले आणि 12 जण जखमी झाले. शनिवारी, डॉनने दहशतवादविरोधी विभागाच्या (सीटीडी) निवेदनाचा हवाला देत म्हटले की अज्ञात हल्लेखोराविरुद्ध खून आणि दहशतवादाच्या गुन्ह्यांसह एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4