Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Crime News :  तामिळनाडूतील वाकाठी गावात १८ महिलांवर झालेल्या बलात्कारप्रकरणी २१५ सरकारी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या छाप्यादरम्यान महिलांचा लैंगिक छळ आणि आदिवासींवर झालेल्या अत्याचारचे  हे प्रकरण आहे.

तामिळनाडूतील वाकाठी गावात 1992 मध्ये पोलीस आणि वनविभागाने चंदन तस्करीच्या विरोधात टाकलेल्या छाप्यादरम्यान 18 महिलांवर बलात्काराची ही घटना घडली होती. यानंतर राज्यभर संतापाची लाट पसरली. यापूर्वी धर्मपुरीच्या कनिष्ठ न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवून 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतु सर्व 215 लोकांनी त्यांना दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात अपील केले होते. परंतु मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावले आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

धर्मपुरी न्यायालयाने 126 वन कर्मचारी, 84 पोलीस कर्मचारी आणि चार भारतीय वन सेवा (IFS) अधिकार्‍यांसह महसूल विभागातील पाच जणांना 1992 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी दोषी ठरवले होते. 269 आरोपींपैकी 54 आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.

https://youtube.com/shorts/LLrVrVQpCd4?si=eqsX7Qv1NCTZNyMe

महत्त्वाच्या बातम्या-

World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Rohit Pawar : सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?