मतमोजणीला सुरुवात होताच रवींद्र धंगेकर यांनी पोस्टल मतांमध्ये घेतली आघाडी

Pune – पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीची आज कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होत आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या (Kasba Bypoll Election Result) 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. यातच आता कसबा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. आता ही आघाडी ते कायम ठेवतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.