Suhani Bhatnagar | दंगलमधील ‘छोट्या बबीता’चे निधन, अभिनेत्री सुहानी भटनागरच्या अवघ्या १९व्या वर्षी मृत्यू

आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात दिसलेली बालकलाकार सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचे निधन झाले आहे. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानीने जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत सुहानीचे निधन झाले. चुकीच्या उपचारामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘दंगल’ चित्रपटात सुहानीने छोट्या बबिताची भूमिका साकारली होती. तिच्या निधनाने सिनेजगतात शोककळा पसरली आहे.

चुकीच्या उपचाराने जीव घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी सुहानी भटनागरच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला फ्रॅक्चर झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या औषधांचे दुष्परिणाम होऊ लागले. अभिनेत्रीच्या शरीरात द्रव तयार होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुहानी दीर्घकाळापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल होती. तिच्या पार्थिवावर शनिवारी फरिदाबाद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

‘दंगल’ चित्रपटात सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) छोटी बबिताच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात ती आमिर खान, साक्षी तन्वर आणि जायरा वसीमसोबत दिसली होती. सुहानीला तिच्या अभिनयाचे कौतुकही मिळाले. ‘दंगल’नंतर सुहानी भटनागरही अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली होती. काही काळानंतर तिने अभिनय सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

आमिर खान प्रॉडक्शनने शोक व्यक्त केला
सुहानी भटनागरच्या निधनावर आमिर खान प्रॉडक्शनने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी सुहानीला अभिनयासाठी एक स्टार असे म्हटले आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे प्रॉडक्शन हाऊसला धक्का बसल्याचेही सांगण्यात आले. ती त्यांच्यासाठी स्टार होती आणि नेहमीच असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?